Samas 10
समास 10 - समास दहावा : शून्यत्वनिर्शननाम
समास 10 - दशक ८
समास दहावा : शून्यत्वनिर्शननाम ॥ श्रीराम ॥
जनाचे अनुभव पुसतां । कळहो उठिल अवचिता । हा कथाकल्लोळ श्रोतां । कौतुकें ऐकावा ॥ १ ॥ श्री समर्थ म्हणतात की, लोकांना त्यांच्या त्यांच्या अनुभवाबद्दल विचारताच एकच गदाशेळ स्त्य. प्रत्येकजण आपले मत, अनुभव सांगू लागला. त्यामुळे जो काही कल्लोळ उडाला, तो श्रोत्यांनी कौतुकाने ऐकावा. (१)
येक म्हणती हा संसारु । करितां पाविजे पैलपारु । आपला नव्हे कीं जोजारु । जीव देवाचे ॥ २ ॥ एक म्हणतो की, हा संसार करता करताच आपण पैक्सीसला पोहोचू हा व्याप आपला थोडाच आहे ? सर्व जीव देवाचे आहेत. (२)
येक म्हणती हें न घडे । लोभ येऊन आंगीं जडे । पोटस्तें करणें घडे । सेवा कुटुंबाची ॥ ३ ॥ दुसरा कुणी म्हणतो की, असे काही घडणार नाही. संसार करता करता लोभ येऊन अंगाला चिकटतो. पोयसाठी कुटुंबाची सेवा करणे भाग पडते. (३)
येक म्हणती स्वभावें । संसार करावा सुखें नावें । कांहीं दान पुण्य करावें । सद्ग तीकारणें ॥ ४ ॥ कुणी म्हणतात की सुखेनैव संसार करावा मात्र सद्गती प्रास व्हावी म्हणून काही दान, पुण्य आदीही करावे. (४)
येक म्हणती संसार खोटा । वैराग्यें घ्यावा देशवटा । येणें स्वर्ग्यलोकींच्या वाटा । मोकळ्या होती ॥ ५ ॥ कुणी म्हणतात की संसार खोय आहे. म्हणून वैराग्य धारण करून देशत्याग करावा म्हणजे स्वर्गप्रासीचे अनेक मार्ग मोकळे होतात. (५)
येक म्हणती कोठें जावें । वेर्थचि कासया हिंडावें । आपुलें आश्रमी असावें । आश्रमधर्म करूनी ॥ ६ ॥ कुणी म्हणतात की उगीच कोठेजायचे ? व्यर्थ कशाला इकडे-तिकडेहिंडायचे ! त्यापेक्षा आपला जो आश्रम असेल त्याचे आचरण त्या आश्रमात राहूनच करावे (६)
येक म्हणती कैंचा धर्म । अवघा होतसे अधर्म । ये संसारीं नाना कर्म । करणें लागे ॥ ७ ॥ कुणी म्हणतात की, कुठला आला आहे धर्म ? सर्व अधर्मच घडत असतो. या संसारात नाना प्रकारची कर्मे करावी लागतात (७)
येक म्हणती बहुतांपरी । वासना असावी वरी । येणेंचि तरिजे संसारीं । अनायासें ॥ ८ ॥ कुणी म्हणतात की, या सर्वापेक्षा आपली वासना बरी असावी म्हणजे अनायासे हा संसार तरून जाता येतो. (८)
येक म्हणती कारण भाव । भावेंचि पाविजे देव । येर हें अवघेंचि वाव । गथागोवी ॥ ९ ॥ एक म्हणतात की, आपला भावच सर्व गोष्टीस कारण असतो. भाव चांगला असेल तर त्यामुळे देवाचीही प्राप्ती होते. भावाशिवाय सर्व व्यर्थ आहे. गोंधळ आहे. (९)
येक म्हणती वडिलें जीवीं । अवघीं देवचि मानावीं । मायेबापें पूजीत जावीं । येकाभावें ॥ १० ॥ आपल्या आईवडिलांना जीवाभावाने देवच मानीत जावे व एकनिष्ठपणाने आई-वडिलांची पूजा करावी. (१०)
येक म्हणती देवब्राह्मण । त्यांचें करावें पूजन । मायेबाप नारायेण । विश्वजनाचा ॥ ११ ॥ कुणी म्हणतात की, देवाब्राह्मणांचे पूजन करावे. त्यामुळे भगवान नारायण प्रसन्न होतात. (११)
येक म्हणती शास्त्र पाहावें । तेथें निरोपिलें देवें । तेणें प्रमाणेंचि जावें । परलोकासी ॥ १२ ॥ कुणी म्हणतात की, शास्त्रात काय सांगितले आहे त्याप्रमाणे वागावे, असे भगवान म्हणतात. त्याप्रमाणे वागले असता परलोक प्रास होतो. (१२)
येक म्हणती अहो जना । शास्त्र पाहातां पुरवेना । याकारणें साधुजना । शरण जावें ॥ १३ ॥ एक म्हणतात की, अहो, शास्त्रे इतकी आहेत की त्यांचा अभ्यास करायला आयुष्य पुरे पडणार नाही. म्हणून त्यापेक्षा साधू-संतांना शरण जावे, हे बरे (१३)
येक म्हणती सांडा गोठी । वायांचि करिता चाउटी । सर्वांस कारण पोटीं । भूतदया असावी ॥ १४ ॥ कुणी म्हणतात की, उगीच वटवट करणे बंद कस. ती गोष्ट राहू दे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पोयत भूतदया असावी. (१४)
येक म्हणती येकचि बरवें । आपुल्या आचारें असावें । अंतकाळीं नाम घ्यावें । सर्वोत्तमाचें ॥ १५ ॥ एक म्हणतात की, आपापल्या वर्णाश्रमधर्माप्रमाणे आचारकसवा हेसर्वांत चांगले. आणि अंतकाळी सर्वोत्तमाचे नाव घ्यावे. (१५)
येक म्हणती पुण्य असेल । तरीच नाम येईल । नाहीं तरी भुली पडेल । अंतकाळीं ॥ १६ ॥ दुसस कुणी म्हणतो की, जर गाठी पुण्य असेल तरच अंतकाळी मुखात नाम येईल, नाहीतर विसर पडेल, भ्रांती उत्पन्न होईल. (१६)
येक म्हणती जीत असावे । तंवचि सार्थक करावें । येक म्हणती फिरावें । तिर्थाटण ॥ १७ ॥ एक म्हणतात की, जिवंतपणी आयुष्याचे सार्थक करावे. तर दुसरा कुणी म्हणतो की, तीर्थयात्रा करीत फिरावे हे चांगले. (१७)
येक म्हणती हे अटाटी । पाणीपाषाणाची भेटी । चुबकळ्या मारितां हिंपुटी । कासाविस व्हावें ॥ १८ ॥ कुणी एकम्हणतो की, व्यर्थ खययेप कशाला करावा ? तीर्थक्षेत्रात जिकडे-तिकडेपाणी आणि पाषाणाशिवाय काय आहे ? तीर्थात बुचकळ्या मारताना नाकातोंडात पाणी जाऊन कष्ट होतात आणि जीव मात्र कासावीस होतो. (१८)
येक म्हणती सांडी वाचाळी । अगाध महिमा भूमंडळीं । दर्शनमात्रें होय होळी । माहापातकाची ॥ १९ ॥ त्यावर दुसग कुणी म्हणतो की, वाचाळपणा बंद कर या पृथ्वीवर तीर्थक्षेत्रांचा महिमा अगाध आहे. केवळ त्यांच्या दर्शनाने मोठमोठी पातके भस्म होऊन जातात. (१९)
येक म्हणती तीर्थ स्वभावें । कारण मन अवरावें । येक म्हणती कीर्तन करावें । सावकास ॥ २० ॥ कुणी एक म्हणतो की, मनच बंधमोक्षाला कारण असल्याने संयमाने त्यासच आवरावे म्हणजे तेच तीर्थस्वरूप बनते, तर दुसग कुणी म्हणतो की, वेळ मिळेल तेव्हा कीर्तन करीत जावे. (२०)
येक म्हणती योग बरवा । मुख्य तोचि आधीं साधावा । देहो अमरचि करावा । अकस्मात ॥ २१ ॥ कुणी म्हणतो योग हेच उत्तम साधन आहे. म्हणून तोच मुख्य साधावा आणि एकाएकी आपला देहच अमर करावा. (२१)
येक म्हणती ऐसें काये । काळवंचना करूं नये । येक म्हणती धरावी सोये । भक्तिमार्गाची ॥ २२ ॥ त्यावर दुसरा कुणी म्हणतो की, हे बरे नाही. माणसाने काळाची फसवणूक करू नये. तर तिसराच कुणी म्हणतो की, आपण आपले भक्तिमार्गास लागावे हे बरे (२२)
येक म्हणती ज्ञान बरवें । येक म्हणती साधन करावें । येक म्हणती मुक्त असावें । निरंतर ॥ २३ ॥ कुणी म्हणतात की, ज्ञान उत्तम. कुणी म्हणतात की, साधन करावे. तर आणखी कुणी म्हणतात की, निरंतर मुक्तच असावे. (२३)
येक म्हणती अनर्गळा । धरीं पापाचा कंटाळा । येक म्हणती रे मोकळा । मार्ग आमुचा ॥ २४ ॥ त्यावर कुणी एखादा म्हणतो की, अरे उचंखल माणसा, जरा तरी पापाचा कंयळा धर ! त्यावर कुणी उत्तर देतो की, अरे आमचा मार्गच मुळी मोकळेपणाने वागण्याचा आहे. (२४)
येक म्हणती हें विशेष । करूं नये निंदा द्वेष । येक म्हणती सावकास । दुष्टसंग त्यागावा ॥ २५ ॥ कुणी म्हणतो की, कुणाचीही निंदा अथवा द्वेष करू नये हे महत्त्वाचे आहे. तर दुसरा म्हणतो की, हळूहळू दुष्टांची संगत सोडावी. (२५)
येक म्हणती ज्याचें खावें । त्या सन्मुखचि मरावें । तेणें तत्काळचि पावावें । मोक्षपद ॥ २६ ॥ कुणी म्हणतात की, ज्याचे अन्न आपण खातो त्याची चाकरी करीत त्याच्यासमोर मरावे म्हणजे तत्काळ मोक्षपद प्रास होते. (२६)
येक म्हणती सांडा गोठी । आधीं पाहिजे ते रोटी । मग करावी चाउटी । सावकास ॥ २७ ॥ कुणी म्हणतात की, या सर्व गोष्टी राहू दे. आधी पोयला अन्न कसे मिळेल हे पाहिले पाहिजे. इतर वटवट नंतर सावकाश करीत बसावे. (२७)
येक म्हणती पाउस असावा । मग सकळ योग बरवा । कारण दुष्काळ न पडावा । म्हणिजे बरें ॥ २८ ॥ कुणी म्हणतात की, प्रथम चांगला पाऊस पडावा म्हणजे मग इतर गोष्टी सुरळीत चालतात. दुष्काळ पडला नाही म्हणजे बरे (२८)
येक म्हणती तपोनिधी । होतां वोळती सकळ सिद्धी । येक म्हणती रे आधीं । इंद्रपद साधावें ॥ २९ ॥ कुणी म्हणतात की, खूप तप केले पाहिजे म्हणजे मग सिद्धी प्राप्त होतात. दुसरा कुणी म्हणतो की, आधी इंद्रपदाची प्राप्ती करून घ्यावी. (२९)
येक म्हणती आगम पाहावा । वेताळ प्रसन्न करून घ्यावा । तेणें पाविजे देवा । स्वर्गलोकीं ॥ ३० ॥ कुणी म्हणतात की, तंत्रशास्त्राचा अभ्यास करून आधी वेताळाला प्रसन्न करून घ्यावे. त्यायोगे स्वर्गलोक प्रास होऊन देव भेटतो (३०)
येक म्हणती अघोरमंत्र । तेणें होईजे स्वतंत्र । श्रीहरी जयेचा कळत्र । तेचि वोळे ॥ ३१ ॥ कुणी म्हणतात की, अघोर मंत्राचे अनुष्ठान करावे म्हणजे स्वतंत्र होता येते व जिचा आधार श्रीहरी आहे ती ल्यी प्रसन्न होते. (३१)
ती लागले सर्व धर्म । तेथें कैंचें क्रियाकर्म । येक म्हणती कुकर्म । तिच्या मदे ॥ ३२ ॥ त्या लक्ष्मीच्या योगेच सर्व धर्म घडतात. मग तेथे क्रियाकर्माची आवश्यकता उरत नाही. तर दुसरा कुणी म्हणतो की, क्लीच्या मदानेच कुकर्म घडते. (३२)
येक म्हणती येक साक्षप । करावा मृत्यंजयाचा जप । तेणें गुणें सर्व संकल्प । सिद्धीतें पावती ॥ ३३ ॥ कुणी म्हणतात की, एक प्रयत्न जरूर करून पहावा. मृत्युंजयाचा जप केला की, त्यायोगे सर्व संकल्प सिद्धीस जातात (३३)
येक म्हणती बटु भैरव । तेणें पाविजे वैभव । येक म्हणती झोटिंग सर्व । पुर्वितसे ॥ ३४ ॥ कुणी म्हणतो की, बहुक भैरवाची उपासना केली की, वैभव प्रास होते. दुसरा कुणी म्हणतो की, झोटिंग सर्व इच्छा पूर्ण करतो. (३४)
येक म्हणती काळी कंकाळी । येक म्हणती भद्रकाळी । येक म्हणती उचिष्ट चांडाळी । साहें करावी ॥ ३५ ॥ कुणी म्हणतात, काळी कंकाळी, तर दुसरे कुणी म्हणतात, भद्रकाळी तर आणखी कुणी म्हणतात की, उच्छिष्ट चांडाळी साह्य करून घ्यावी. (३५)
येक म्हणती विघ्नहर । येक म्हणती भोळा शंकर । येक म्हणती सत्वर । पावे भगवती ॥ ३६ ॥ कुणी म्हणतात विध्यहर लवकर पावतो, तर दुसरे कुणी म्हणतात की भोळा शंकर लवकर पावतो, तर कुणी म्हणतात की भगवती सत्वर पावते. (३६)
येक म्हणती मल्लारी । सत्वरचि सभाग्य करी । येक म्हणती माहा बरी । भक्ति वेंकटेशाची ॥ ३७ ॥ कुणी एक म्हणतो की, मल्हारीच्या कृपेने लवकर भाग्योदय होतो, तर दुसरा कुणी म्हणतो, व्यंकटेशाची भक्ती करावी हे फार उत्तम. (३७)
येक म्हणती पूर्व ठेवा । येक म्हणती प्रेत्न करावा । येक म्हणती भार घालावा । देवाच वरी ॥ ३८ ॥ कुणी म्हणतात पूर्वप्रारव्य असेल तसे होईल, तर दुसरे कुणी म्हणतात की, प्रयत्न करावा तर आणखी कुणी म्हणतात की, सर्व भार देवावरच घालावा. (३८)
येक म्हणती देव कैंचा । अंतचि पाहातो भल्यांचा । येक म्हणती हा युगाचा । युगधर्म ॥ ३९ ॥ कुणी म्हणतो की, कसला आलाय देव ! तो भल्याभल्यांचा अंत पाहतो ! तर दुसरा कुणी म्हणतो की, हा युगाचा युगधर्मच आहे. (३९)
येक आश्चीर्य मानिती । येक विस्मयो करिती । येक कंटाळोन म्हणती । काये होईल तें पाहावें ॥ ४० ॥ ही बोलणी ऐकून कुणी आश्चर्य करतात, तर कुणी चकित होतात. तर कुणी कटळून म्हणतात की, जे जे होईल ते पाहावे ! (४०)
ऐसे प्रपंचिक जन । लक्षणें सांगतां गहन । परंतु कांहीं येक चिन्ह । अल्पमात्र बोलिलों ॥ ४१ ॥ याप्रमाणे प्रापंचिक लोक आपापली मते सांगतात. ती अपार आहेत, परंतु थोडी कल्पना यावी, म्हणून त्यातली काही येथे सांगितली आहेत. (४१)
आतां असो हा स्वभाव । ज्ञात्यांचा कैसा अनुभव । तोहि सांगिजेल सर्व । सावध ऐका ॥ ४२ ॥ असो. आता प्रापंचिकांचा स्वभाव सांगणे पुरे झाले. ज्ञानी लोकांचा अनुभव कसा असतो तेही सर्व आता सांगतो. सावधपणे ऐका. (४२)
येक म्हणती करावी भक्ती । श्रीहरी देईल सद्गती । येक म्हणती ब्रह्मप्राप्ती । कर्मेंचि होये ॥ ४३ ॥ कुणी म्हणतात की, भगवंताची भक्ती करावी म्हणजे श्रीहरी सद्गती देईल. तर दुसरे कुणी म्हणतात की, कर्मानेच ब्रह्मप्रासी होते. (४३)
येक म्हणती भोग सुटेना । ज्न्ममरण हें तुटेना । येक म्हणती उर्मी नाना । अज्ञानाच्या ॥ ४४ ॥ कुणी म्हणतात की, प्रारब्ध भोग टक्या येत नाहीत आणि त्यामुळे जन्ममरणातूनही सुटका होत नाही. कुणी म्हणतात की, या अज्ञानाच्याच अनेक ऊर्मी आहेत. (४४)
येक म्हणती सर्व ब्रह्म । तेथें कैंचें क्रियाकर्म । येक म्हणती हा अधर्म । बोलोंचि नये ॥ ४५ ॥ एखादा म्हणतो की, सर्व ब्रह्मच आहे, मग तेथे क्रिया तरी कुठली आणि कर्म तरी कुठले ? तर दुसरा कुणी म्हणतो की, असे मानणे हा अधर्म आहे. खरे तर असे बोलूसुद्धा नये. (४५)
येक म्हणती सर्व नासें । उरलें तेंचि ब्रह्म असे । येक म्हणती ऐसें नसे । समाधान ॥ ४६ ॥ कुणी म्हणतात की, प्रलयाच्या वेळी सर्व नाश पावल्यावर उरते ते ब्रह्म. तर कुणी म्हणतात की, समाधान अशा प्रकारचे नसते. (४६)
सर्वब्रह्म केवळ ब्रह्म । दोनी पूर्वपक्षाचे भ्रम । अनुभवाचें वेगळें वर्म । म्हणती येक ॥ ४७ ॥ कुणी म्हणतात की, सर्व ब्रह्म असे म्हणणे व सर्व जाऊन उरते ते ब्रह्म म्हणणे हे दोन्ही पूर्वपक्षाचे श्रम आहेत. अनुभवाचे वर्म काही वेगळेच आहे. (४७)
येक म्हणती हें न घडे । अनुर्वाच्य वस्तु घडे । जें बोलतां मोन्य पडे । वेदशास्त्रांसी ॥ ४८ ॥ एक म्हणतात की, जी अनिर्वाच्य वस्तू आहे तिचे वर्णन होऊ शकत नाही. वेद आणि शास्त्रे यांनाही त्याचे वर्णन करताना मौन धरावे लागते. (४८)
तव श्रोता अनुवादला । म्हणे निश्चये कोण केला । सिद्धांतमतें अनुभवाला । उरी कैंची ॥ ४९ ॥ येथे श्रोत्यांनी शंका घेतली की, ब्रह्म कसे आहे हा निश्चय कोणी केला ? सिद्धांत असा आहे की, तेथे अनुभवाला वावच नाही. म्हणजे अनुभवरूपी द्वैतही ब्रह्माच्या ठिकाणी उरत नाही असा सिद्धांत आहे. (४९)
अनुभव देहीं वेगळाले । हें पूर्वीच बोलिलें । आतां कांहीं येक केलें । नवचे कीं ॥ ५० ॥ प्रत्येक देहाचे अनुभव वेगवेगळे असतात असे पूर्वीच सांगितले आहे. आता काही केले तरी ते एक होऊ शकत नाहीत. (५०)
येक साक्षत्वें वर्तती । साक्षी वेगळाचि म्हणती । आपण दृष्टा ऐसी स्थिती । स्वानुभवाची ॥ ५१ ॥ एखादा साक्षित्वाने वागतो, साक्षी वेगळाच आहे असेही म्हणतो. आपण द्रष्टा, साक्षी ही स्वानुभवाची स्थिती आहे. (५१)
दृश्यापासून द्रष्टा वेगळा । ऐसी अलिप्तपणाची कळा । आपण साक्षत्वें निराळा । स्वानुभवे ॥ ५२ ॥ दृश्यापासून द्रष्ट नेहमी वेगळाच असतो. याचा साक्षात अनुभव आला की दृश्यात राहूनही अलिप्त कसे सहावे ही कला अवगत होते आणि मग त्याला तसा आपण साक्षित्वाने निराळे असल्याचा अनुभवही येतो. (५२)
सकळ पदार्थ जाणतां । तो पदार्थाहून पर्ता । देहीं असोनी अलिप्तता । सहजचि जाली ॥ ५३ ॥ जो सर्व पदार्थांना जाणतो तो त्या सर्व पदार्थांहून वेगळाच असतो. त्यामुळे ज्ञाता देहात असूनही सहजच त्यापासून अलिप्त असतो. (५३)
येक ऐसें स्वानुभवें । म्हणती साक्षत्वें वर्तावें । दृश्य असोनि वेगळें व्हावें । द्रष्टेपणें ॥ ५४ ॥ एक स्वानुभवाने असे म्हणतात की, आपण साक्षित्वाने वेगळे आहोत. म्हणून दृश्यात असूनही द्रष्टेपणाने त्यापासून वेगळे व्हावे. (५४)
येक म्हणती नाहीं भेद । वस्तु ठाईंची अभेद । तेथें कैंचा मतिमंद द्रष्टा आणिला ॥ ५५ ॥ कुणी दुसरे असे म्हणतात की, आत्मवस्तु एक आहे. तेथे भेदच नसताना यात हा मतिमंद द्रष्टा कसा आणला ? (५५)
अवघी साकरचि स्वभावें । तेथें कडु काय निवडावें । द्रष्टा कैंचा स्वानुभवें । अवघेंचि ब्रह्म ॥ ५६ ॥ सर्वच जर साखर आहे तर त्यातून कडू कसे काय निवडावे ? त्यामुळे ब्रह्माशिवाय दुसरे काही नाही, हा स्वानुभव असताना तेथे द्रष्टा कोल आणला ? (५६)
प्रपंच परब्रह्म अभेद । भेदवादी मानिती भेद । परी हा आत्मा स्वानंद । आकारला ॥ ५७ ॥ प्रपंच, परब्रह्म यात भेदच नाही. हे एकरूप आहेत. पण भेदवादी लोक त्यात भेद मानतात. खरे तर स्वानंदरूप आत्माच दृश्यरूपाने आकाराला आला आहे. (५७)
विघुरलें तुप थिजलें । तैसें निर्गुणचि गुणा आलें । तेथें काय वेगळें केलें । द्रष्टेपणें ॥ ५८ ॥ पातळतूप असते तेच थिजून घट्टहोते, त्याप्रमाणेनिर्गुण ब्रह्मच सगुण होते. तेथे द्रष्टेपणाने काय वेगळे केले ?(५८)
म्हणौनि द्रष्टा आणी दृश्य । अवघा येकचि जगदीश । द्रष्टेपणाचे सायास । कासयासी ॥ ५९ ॥ म्हणून द्रष्टा आणि दृश्य मिळून सर्व एकच एक जगदीशच जर आहे, द्रष्टेपणाचे सायास कशाला ?(५९)
ब्रह्मचि आकारलें सर्व । ऐसा येकांचा अनुभव । ऐसे हे दोनी स्वभाव । निरोपिले ॥ ६० ॥ सर्व दृश्य जग म्हणजे परब्रह्मच साकार झालेले आहे, असा एखाद्याचा अनुभव असतो. याप्रमाणे हे दोन्ही स्वभाव वर्णन केले आहेत. (६०)
अवघा आत्मा आकाराअ । आपण भिन्न कैंचा उरला । दुसरा अनुभव बोलिला । ऐसियापरी ॥ ६१ ॥ एक आत्याचएकलाएक आकारास आला आहे. त्याहून दुसरी वस्तूच नाही. तेथे आपण भिन्न उरतोच कोठे ? असा हा दुसऱ्या काही लोकांचा अनुभव येथे सांगितला आहे. (६१)
ऐक तिसरा अनुभव । प्रपंच सारूनियां सर्व । कांहीं नाहीं तोचि देव । ऐसें म्हणती ॥ ६२ ॥ आता तिसरा अनुभव सांगतो तो ऐक. सर्व दृश्य वृष्टीचा पसारा बाजूला सारल्यावर काहीही नाही असे जे वाटते, तोच देव, असे काही लोक म्हणतात. (६२)
दृश्य अवघें वेगळें केलें । केवळ अदृश्यचि उरलें । तेंचि ब्रह्म अनुभविलें । म्हणती येक ॥ ६३ ॥ सर्व दृश्य वेगळे केल्यावर केवळ अदृश्य जे उरले तेच ब्रह्म असा अनुभव काही लोक सांगतात. (६३)
परी तें ब्रह्म म्हणों नये । उपायासारिखा अपाये । सुन्यत्वास ब्रह्म काये । म्हणों येईल ॥ ६४ ॥ पण त्याला ब्रह्म म्हणू नये. कारण शून्याला ब्रह्म म्हटल्याने उपायच अपाय ठरेल. शून्यत्वाला कधी ब्रह्म म्हणता येईल का ? (६४)
दृश्य अवघें वोलांडिलें । अदृश्य सुन्यत्वीं पडिलें । ब्रह्म म्हणौनि मुरडलें । तेथुनिच मागे ॥ ६५ ॥ दृश्य सर्व ओलांडले की अदृश्यच शिल्लक राहते. ते शून्यरूप असते. साधक त्यालाच ब्रह्म समजतो आणि मागे फिरतो. (६५)
इकडे दृश्य तिकडे देव । मध्यें सुन्यत्वाचा ठाव । तयास मंदबुद्धिस्तव । प्राणी ब्रह्म म्हणे ॥ ६६ ॥ एकीकडे दृश्य असते, दुसरीकडे देव असतो. मध्ये शून्यत्व असते, पण अज्ञानामुळे प्राणी त्यालाच ब्रह्म समजतो. (६६)
रायास नाहीं वोळखिलें । सेवकास रावसें कल्पिलें । परी तें अवघें वेर्थ गेलें । राजा देखतां ॥ ६७ ॥ एखाद्याने रुजाला ओळखत नसल्याने सेवकालाच सजा मानले, पण प्रत्यक्ष गजाची भेट झाल्यावर ते सर्व व्यर्थ ठरले. (६७)
तैसें सुन्यत्व कल्पिलें ब्रह्म । पुढें देखतां परब्रह्म । सुन्यत्वचा अवघा भ्रम । तुटोन गेला ॥ ६८ ॥ तसे शून्यत्व हेच ब्रह्म अशी कल्पना केली, पण पुढे परब्रह्माचा साक्षात अनुभव आल्यावर शून्यत्व हेच ब्रह्म हा सर्व श्रम नष्ट झाला. (६८)
परी हा सूक्ष्म आडताळा । वारी विवेकें वेगळा । जैसें दुग्ध घेऊन जळा । राजहंस सांडी ॥ ६९ ॥ म्हणून हा सूक्ष्म अडथळा, राजहंस ज्याप्रमाणे पाण्याचा त्याग करून दूध तेवढे घेतो त्याप्रमाणे साससारविवेकाने दूर सासवा. (६९)
आधीं दृश्या सोडिलें । मग सुन्यत्व वोलांडिलें । मूळमायेपरतें देखिलें । परब्रह्म ॥ ७० ॥ आधी दृश्य पांचभौतिक वृष्टीचा त्याग करावा, मग शून्यत्व ओलांडावे आणि मूळमायेच्या पलीकडे असलेले परब्रह्म पाहावे. (७०)
वेगळेपणें पाहाणें घडे । तेणें वृत्ति सुन्यत्वीं पडे । पोटीं संदेह पवाडे । सुन्यत्वाचा ॥ ७१ ॥ पाहावे असे म्हटले की, जी वस्तू पाहावयाची ती व पाहणारा असा वेगळेपणा येतो, त्यामुळे वृत्ती शून्यत्वात पडते आणि मग शून्यत्व हेच ब्रह्म असा मनात संदेह उत्पन्न होतो. (७१)
भिन्नपणें अनुभविलें । तयास सुन्य ऐसें बोलिलें । वस्तु लक्षितां अभिन्न जालें । पाहिजे आधीं ॥ ७२ ॥ भिन्नपणे जे अनुभवले ते ‘ काही नाही ‘ म्हणून त्याला शून्य असे नाव दिले. पण आत्मवस्तूचे अनुसंधान करू लागले की त्याच्याशी एकरूपता व्हावयास हवी. (७२)
वस्तु आपणचि होणें । ऐसें वस्तुचें पाहाणें । निश्चयेंसीं भिन्नपणें । सुन्यत्व लाभे ॥ ७३ ॥ आत्मवस्तूला पाहणे म्हणजे ती वस्तू स्वतः आपणच होणे या प्रकारचे असते. भिन्नपणामुळे निश्चितच शून्यत्याची प्राप्ती होते. (७३)
याकारणें सुन्य कांहीं । परब्रह्म होणार नाहीं । वस्तुरूप होऊन पाहीं । स्वानुभवें ॥ ७४ ॥ म्हणून शून्य हे परब्रह्म होऊ शकत नाही. स्वतः अनुभव घ्यावा व ब्रह्मस्वरूपच होऊन सहावे. (७४)
आपण वस्तु सिद्धचि आहे । मन मी ऐसें कल्पूं नये । साधु सांगती उपाये । तूंचि आत्मा ॥ ७५ ॥ आपण स्वयंसिद्ध आत्मावरच आहोत. म्हणून मी म्हणजे मन अशी कल्पना करूनये. यावरसाधूउपाय सांगतात की, तूच आत्या आहेस असे अनुसंधान करावे. (७५)
मन मी ऐसें नाथिलें । संतीं नाहीं निरोपिलें । मानावें कोणाच्या बोलें । मन मी ऐसें ॥ ७६ ॥ मी मुळात मन नाहीच. शिवाय संतांनीही तसे सांगितलेले नाही. मग कुणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून ‘ मी ‘ मन असे मानावे ? (७६)
संतवचनीं ठेवितां भावे । तोचि शुद्ध स्वानुभव । मनाचा तैसाच स्वभाव । आपण वस्तु ॥ ७७ ॥ संतवचनावर दृढ निष्ठा ठेवावी. कारण त्यांची वचने स्वानुभवावर आधारित असतात. मनाला जसे वळण लावावे तसे ते लागते हा मनाचा स्वभाव आहे. म्हणून आपण आत्मवस्तूच आहोत ही गोष्ट मनावर ठसविण्याचा प्रयत्न करावा. (७७)
जयाचा घ्यावा अनुभव । तोचि आपण निरावेव । आपुला घेती अनुभव । विश्वजन ॥ ७८ ॥ ज्याचा आपण अनुभव घ्यावयास जातो ती अवयवरहित वस्तूच आपण होतो हा अनुभव आपण घ्यावा. या आपल्या अनुभवाचा लाभ जगातील इतर लोकांनाही मिळतो. (७८)
लोभी धन साधूं गेले । तंव ते लोभी धनचि जाले । मग भाग्यपुरुषीं भोगिलें । सावकास ॥ ७९ ॥ लोभी माणूस हा धनाचा शोध घेऊ लागतो व अखेर तो धनच होतो. त्याची वृत्ती केवळ धनरूप बनते. तो स्वतः त्या धनाचा उपभोगही घेत नाही आणि मग दुसराच कुणी भाग्यवान पुरुष त्या धनाचा दीर्घकाळ उपभोग घेतो. (७९)
तैसें देहबुद्धी सोडितां । साधकास जालें तत्वता । अनुभवाची मुख्य वार्ता । ते हे ऐसी ॥ ८० ॥ त्याप्रमाणे साधकाने देहबुद्धी सोडली की, तो स्वतःच ब्रह्मरूप होतो. अनुभवाशिवाय स्वानुभवाची हीच मुख्य गोम म्हणजे रहस्य आहे. (८०)
आपण वस्तु मुळीं येक । ऐसा ज्ञानाचा विवेक । येथून हा ज्ञानदशक । संपूर्ण जाला ॥ ८१ ॥ आपण आणि आत्मवस्तु म्हणा अगर परब्रह्मवस्तू म्हणा, मुळात एकच आहोत हे ज्ञानाच्या विचाराचे सार आहे. याप्रमाणे येथे हा ज्ञानदशक संपूर्ण झाला आहे. (८१)
आत्मज्ञान निरोपिलें । येथामतीनें बोलिलें । न्यूनपर्ण क्ष्मा केलें । पाहिजे श्रोतीं ॥ ८२ ॥ मी माझ्या बुद्धीनुसार आत्मज्ञानाचे निरूपण केले आहे. त्यात अधिक-उणे जे असेल त्यासाठी श्रोत्यांनी क्षमा केली पाहिजे, असे श्री समर्थ म्हणतात (८२)
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे शून्यत्वनिर्शननाम समास दहावा ॥
॥ दशक आठवा समाप्त ॥