उपासना

Samas 7

समास 7 - समास सातवा : मोक्षलक्षण

समास 7 - दशक ८

समास सातवा : मोक्षलक्षण ॥ श्रीराम ॥

मागां श्रोतयांचा पक्ष । कितां दिवसां होतो मोक्ष । तेचि कथा श्रोते दक्ष । होऊन ऐका ॥ १ ॥ श्रीसमर्थ म्हणतात की, मागे श्रोत्यांनी प्रश्न केला होता, की मोक्ष किती दिवसांत मिळतो ? त्याचे उत्तर आता श्रोत्यांनी दक्ष होऊन ऐकावे. (१)

मोक्षास कैसें जाणावें । मोक्ष कोणास म्हणावें । संतसंगें पावावें । मोक्षास कैसें ॥ २ ॥ मोक्षाला कसे ओळखावे, कुणाला मोक्ष मिळाला असे म्हणावे आणि संतांच्या संगतीने मोक्ष कसा प्रास करावा, हे सर्व आता ऐका. (२)

तरी बद्ध म्हणिजे बांधला । आणि मोक्ष म्हणिजे मोकळा जाला । तो संतसंगें कैसा लाधला । तेंचि ऐका ॥ ३ ॥ तसेच बद्ध म्हणजे बांधलेला आणि मोक्ष म्हणजे मोकळा झालेला. तो मोक्ष संतसंगाने कसा मिळतो, तेही ऐका. (३)

प्राणी संकल्पें बांधला । जीवपणें बद्ध जाला । तो विवेकें मुक्त केला । साधुजनीं ॥ ४ ॥ प्राणी संकल्पाने बांधला जातो आणि जीवपणे बद्ध होतो. त्याला साधुलोक विवेकाने मुक्त करतात. (४)

मी जीव ऐसा संकल्प । दृढ धरितां गेले कल्प । तेणें प्राणी जाला अल्प । देहबुद्धीचा ॥ ५ ॥ मी जीव आहे असा दृढ संकल्प करून युगेच्या युगे गेली आहेत. त्यामुळे प्राणी अल्पज्ञ, देहबुद्धीचा झाला. (५)

मी जीव मज बंधन । मज आहे जन्ममरण । केल्या कर्माचें फळ आपण । भोगीन आतां ॥ ६ ॥ मी जीव आहे, मला बंधन आहे, जन्ममरण आहे. पूर्वी केलेल्या कर्माचे फळ मी आता भोगीन. (६)

पापाचें फळ तें दुःख । आणी पुण्याचें फळ तें सुख । पापपुण्य अवश्यक । भोगणें लागे ॥ ७ ॥ पापाचे फळ दुःख आणि पुण्याचे फळ सुख असते. आपापल्या प्रारव्यानुसार पाप व पुण्य हे भोगावेच लागते. (७)

पापपुण्य भोग सुटेना । आणी गर्भवासहि तुटेना । ऐसी जयाची कल्पना । दृढ जाली ॥ ८ ॥ पापपुण्याचा भोग चुकत नाही आणि गर्भ- वासातूनही सुटका नाही, अशी ज्याची दृढ कल्पना झालेली असते, (८)

तया नाव बांधला। जीवपणें बद्ध जाला । जैसा स्वयें बांधोन कोसला । मृत्यु पावे ॥ ९ ॥ तो जीवपणाने बांधलेला जाणावा. रेशमाचा किडा जसा स्वतःच स्वतःस बांधून घेऊन कोषात गुरफटून घेऊन मरून जातो, (९)

तैसा प्राणी तो अज्ञान । नेणें भगवंताचें ज्ञान । म्हणे माझें जन्ममरण । सुटेचिना ॥ १० ॥ त्याप्रमाणे तो अज्ञानी जीव, भगवंताचे ज्ञान नसल्याने, आपले जन्ममरण काही सुटत नाही, असे म्हणत राहतो. (१०)

आतां कांहीं दान करूं । पुढिलया जन्मास आधारु । तेणें सुखरूप संसारु । होईल माझा ॥ ११ ॥ तो मनात म्हणतो की, आता या जन्मात काही दानधर्म करीन म्हणजे तेवढाच पुढील जन्माला आधार होईल आणि त्या जन्मात तरी माझा संसार सुखाचा होईल. (११)

पूर्वीं दान नाहीं केलें । म्हणोन दरिद्र प्राप्त जालें । आतां तरी कांहीं केलें । पाहिजे कीं ॥ १२ ॥ पूर्वीच्या जन्मात काही दानधर्म केला नाही, म्हणून या जन्मात दारिद्र्य प्रास झाले. निदान आता या जन्मात तरी काही केलेच पाहिजे की ! (१२)

म्हणौनी दिलें वस्त्र जुनें । आणी येक तांब्र नाणें । म्हणे आतां कोटिगुणें । पावेन पुढें ॥ १३ ॥ म्हणून त्याने एक जुने वस्त्र आणि एक तांब्याचे नाणे दान दिले आणि म्हणू लागला की पुढील जन्मात याच्या कोटीगुणाने मला प्राप्ती होईल. (१३)

कुशावर्तीं कुरुक्षेत्रीं । महिमा ऐकोन दान करी । आशा धरिली अभ्यांतरीं । कोटिगुणांची ॥ १४ ॥ कुशावर्त, कुरुक्षेत्रादि तीर्थक्षेत्राऐचा महिमा शेकून. आणि पुढील जन्मी त्याचे पुष्कळ फळ मिळेळ या आशेने कांही दान पुण्य करतो. (१४)

रुका आडका दान केला । अतितास टुक्डा घातला । म्हणे माझा ढीग जाला । कोटि टुकड्यांचा ॥ १५ ॥ एखादा पैसा, दमडीदान केले आणि अतिथीला एखादा तुकडा खाऊ घातला आणि मनात कल्पना करतो आहे की, यामुळे आता पुढे कोटी तुकड्यांचा ढीग मला मिळेल (१५)

तो मी खाईन पुढिलिये जन्मीं । ऐसें कल्पीं अंतर्यामीं । वासना गुंतली जन्मकर्मीं । प्राणीयांची ॥ १६ ॥ तो मी पुढील जन्मात खाईन अशी कल्पना तो अंतर्यामी करू लग्नाला. याप्रमाणे प्राण्यांची वासना जन्मात आणि कर्मफळात गुंतलेली असते. (१६)

आतां मी जें देईन । तें पुढिले जन्मीं पावेन । ऐसें कल्पी तो अज्ञान । बद्ध जाणावा ॥ १७ ॥ आता मी जे जे देईन ते ते मला पुढील जन्मात मिळेल अशी कल्पना जो करतो तो अज्ञानी व बद्ध जाणावा. (१७)

बहुतां जन्माचे अंतीं । होये नरदेहाची प्राप्ती । येथें न होतां ज्ञानें सद्गेती । गर्भवस चुकेना ॥ १८ ॥ अनेक जन्मांच्या शेवटी नरदेहाची प्राप्ती होते. येथे जर ज्ञान मिळवून सद्‌गती प्रास करून घेतली नाही, तर गर्भवास चुकत नाही. (१८)

गर्भवास नरदेहीं घडे । ऐसें हें सर्वथा न घडे । अकस्मात भोगणें पडे । पुन्हा नीच योनी ॥ १९ ॥ बरे परत गर्भवास प्रास झाला तरी नरदेहच प्रास होईल असे सहसा घडत नाही आणि अकस्मात परत नीच योनी भोगावी लागते. (१९)

ऐसा निश्चयो शास्त्रांतरीं । बहुतीं केला बहुतांपरीं । नरदेह संसारीं । परम दुल्लभ असे ॥ २० ॥ अनेकांनी अनेक प्रकारे शास्त्रामध्ये असे निश्चयपूर्वक म्हटले आहे की, या जगात नरदेह परम दुर्लभ आहे. (२०)

पापपुण्य समता घडे । तरीच नरदेह जोडे । येरवीं हा जन्म न घडे । हें व्यासवचन भागवतीं ॥ २१ ॥ श्रीमतू भागवत पुराणात महर्षी वेदव्यास यांनी असे म्हटले आहे की, ज्यावेळी प्राण्याचे पाप व पुण्य समसमान होते, तेव्हाच नरदेह प्रास होतो. एरवी नरदेह प्रास होत नाही. (२१)

॥ श्लोक ॥ नरदेहमाद्यं सुलभं सुदुर्लभं । प्लवं सुकल्पं गुरुकर्णधारं । मायानुकुलेन नभस्वतेरितं । पुमान्भबाब्धिं न तरेत्स आत्महा ॥ श्लोक अर्थ – सर्वप्रथम नरदेह अत्यंत दुर्लभ असूनही भगवस्कूपेने सहज मिळाला आहे. तो सुदृढ होडीसारखा असून गुरुदेव हे त्याचे कर्णधार आहेत, मज भगवंताची कृपा हा अनुकूल वाहणारा वारा आहे. हे सर्व मिळूनही जो मनुष्य भवसागरातून तरून जात नाही, तो आत्मघातकी जाणावा.

नरदेह दुल्लभ । अल्प संकल्पाचा लाभ । गुरु कर्णधारी स्वयंभ । सुख पाववी ॥ २२ ॥ नरदेह दुर्लभ आहे खरा; पण अल्पशा संकल्पाने त्याचा लाभ होतो. गुरू हे कर्णधार असून स्वतःसिद्ध असल्याने ते सुखाची प्राप्ती करून देतात. (२२)

दैव अनुकुळ नव्हे जया । स्वयें पापी तो प्राणीया । भवब्धी न तरवे तया । आत्महत्यारा बोलिजे ॥ २३ ॥ ज्याला देवाची कृपा लाभत नाही, तो प्राणी स्वत: अत्यंत पापी असतो. त्याला भवसागर तरून जाणे शक्य होत नाही. त्याला .आत्मघातकी असे म्हणतात. (२३)

ज्ञानेंविण प्राणीयांसी । जन्ममृत्य लक्ष चौयासी । तितुक्या आत्महत्या त्यासी । म्हणोन आत्महत्यारा ॥ २४ ॥ नरदेहात ज्ञान प्रास करून घेतले नाही तर चौऱ्यांशी लक्ष योनींत जन्म-मरण भोगावे लागते, म्हणजे तितक्या आत्महत्या त्याला घडतात, म्हणून त्याला आत्महत्यारा असे म्हटले आहे. (२४)

नरदेहीं ज्ञानेंविण । कदा न चुके जन्ममरण । भोगणें लागती दारुण । नाना नीच योनी ॥ २५ ॥ नरदेह प्रास झाला असता ज्ञान प्रास करून घेतले नाही तर जन्ममरणपरंपरेतून सुटका होऊ शकत नाही आणि नाना दारुण नीच योनी भोगाव्या लागतात. (२५)

रीस मर्कट श्वान सूकर । अश्व वृषभ म्हैसा खर । काक कुर्कूट जंबुक मार्जर । सरड बेडुक मक्षिका ॥ २६ ॥ अस्वल, माकड कुत्रा, डुक्कर. घोडा, बैल, रेडा, गाढव, कावळा, कोंबडा, कोल्हा, मांजर सरडा, बेडूक, माशी, (२६)

इत्यादिक नीच योनी । ज्ञान नस्तां भोगणें जनीं । आशा धरी मुर्ख प्राणी ॥ पुढिलिया जन्माची ॥ २७ ॥ इत्यादी नीच योनी ज्ञान न झाल्याने लोकांना भोगाव्या लागतात. मूर्ख प्राणी पुढल्या जन्माची आशा धरीत असतो. (२७)

हा नरदेह पडतां । तोंचि पाविजे मागुतां । ऐसा विश्वास धरिजां । लाज नाहीं ॥ २८ ॥ हा नरदेह पडल्यावर पुन्हा नरदेहच मिळेल, असा विश्वास धरण्याची त्यांना लाजही वाटत नाही. (२८)

कोण पुण्याच संग्रहू । जे पुन्हा पाविजे नरदेहो । दुराशा धरिली पाहो । पुढिलिया जन्माची ॥ २९ ॥ त्यांनी काय असा मोठा पुण्यसंग्रह केलेला असतो की परत नरदेहच लाभावा ? पण तरी मनात पुढल्या मनुष्यजन्माची दुराशा बाळगतात. (२९)

ऐसा मुर्ख अज्ञान जन । केलें संकल्पें बंधन । शत्रु आपणासि आपण । होऊन ठेला ॥ ३० ॥ असे जे मूर्ख आणि अज्ञानी लोक असतात, ते स्वतःच्या संकल्पानेच बंधनात पडतात आणि आपण आपलेच शत्रू होऊन राहतात. (३०)

॥ श्लोक ॥ अत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः । अर्थ- आपणच आपले बंधू व आपणच आपले शत्रू असतो

ऐसे संकल्पाचें बंधन । संतसंगे तुटे जाण । ऐक तयाचें लक्षण । सांगिजेल ॥ ३१ ॥ असे जे संकल्पामुळे बंधन उत्पन्न होते ते संतसंगाने तुटते, हे जाणून घ्यावे. आता त्याचे लक्षण सांगतो तेही ऐकावे. (३१)

पांचा भूतांचें शरीर । निर्माण जालें सचराचर । प्रकृतिस्वभावें जगदाकार । वर्तों लागे ॥ ३२ ॥ आपले शरीर तसेच सर्व चराचर हे पंचमहाभूतांपासून झालेले आहे. प्रकृतीच्या स्वभावानुसार या जगातील सर्व कार्य चालले असते. (३२)

देह अवस्ता अभिमान । स्थानें भोग मात्रा गुण । शक्ती आदिकरुन लक्षण । चौपुटी तत्वांचें ॥ ३३ ॥ देह, अवस्था, अभिमान, स्थान, भोग, मात्रा, गुण व शक्ती अशी आठ तत्त्वे एका देहाची व याच्या चौपट म्हणजे बत्तीस तत्त्वे चारी देहांची होतात. (३३)

ऐसी पिंडब्रह्मांड रचना । विस्तारें वाढली कल्पना । निर्धारितां तत्वज्ञाना । मतें भांबावलीं ॥ ३४ ॥ अशी ही पिंडाची, ब्रह्मांडाची रचना विस्तार पावल्याने तत्त्वज्ञानाचा निर्धार करताना अनेक कल्पनांच्या योगे मतामतांचा गोंधळ झाला आहे. (३४)

नाना मतीं नाना भेद । भेदें वाढती वेवाद । परी तो ऐक्यतेचा संवाद । साधु जाणती ॥ ३५ ॥ नाना मते, नाना भेद यांमुळे वादविवाद उत्पन्न झाले आहेत. पण त्या सर्वांचा समन्वय कसा साधायचा ते साधू जाणतात. (३५)

तया संवादाचे लक्षण । पंचभूतिक देह जाण । त्या देहामधें कारण । आत्मा वोळखावा ॥ ३६ ॥ त्या संवादाचे लक्षण याप्रमाणे जाणावे. देह पांचभौतिक आहे. त्यांत आत्मा हा कारण म्हणून ओळखावा. (३६)

देह अंती नासोन जाये । त्यास आत्मा म्हणों नये । नाना तत्वांचा समुदाय । देहामधें आला ॥ ३७ ॥ देह शेवटी नष्ट होतो, म्हणून त्याला आत्मा असे कधीही म्हणू नये. या देहाध्ये नाना तत्त्वे एकत्र आलेली आहेत. (३७)

अंतःकर्ण प्राणादिक । विषये इंद्रियें दशक । हा सूक्ष्माच विवेक । बोलिला शास्त्रीं ॥ ३८ ॥ अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे अंतःकरणपंचक; प्राण, अपान, व्यान, उदान व समान हे प्राणपंचक; शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे विषयपंचक; पाच कर्मेद्रिये व पाच ज्ञानेंद्रिये मिळून २५ तत्त्वांच्या सूक्ष्म देहांचा विचार शास्त्रात केला आहे. (३८)

घेतां सूक्ष्माची शुद्धी । भिन्न अंतःकरण मन बुद्धी । नाना तत्वांचे उपाधी । वेगळा आत्मा ॥ ३९ ॥ सूक्ष्म देहाचा शोध घेऊ लागले की, अंतःकरण, मन, बुद्धी व इतरही नाना तत्त्वांच्या उपाधीहून आत्या वेगळा आहे हे कल्ले. (३९)

स्थूळ सूक्ष्म कारण । माहाकारण विराट हिरण्य । अव्याकृत मूळप्रकृति जाण । ऐसे अष्टदेह ॥ ४० ॥ स्थल. सूक्ष्म, कारण व महाकारण हे पिंडाचे चार व विशद हिरण्य, अव्याकृत व मूळप्रकृती हे ब्रह्मांडाचे चार मिळून आठ देह आहेत ते जाणून घ्यावे. (४०)

च्यारी पिंडी च्यारी ब्रह्मांडीं । ऐसी अष्टदेहाची प्रौढी । प्रकृती पुरुषांची वाढी । दशदेह बोलिजे ॥ ४१ ॥ चार पिंडाचे व चार ब्रह्मांडाचे असे आठ देह होतात, याशिवाय प्रकृती व पुरुष धरून दहा देही सांगितले जातात. (४१)

ऐसें तत्वांचे लक्षण । आत्मा साक्षी विलक्षण । कार्य कर्ता कारण । दृश्या तयाचें ॥ ४२ ॥ याप्रमाणे तत्त्वांचे लक्षण सांगितले आहे; पण आत्या याहूनही विलक्षण म्हणजे लक्षणहीन असून तो या सर्व तत्त्वांचा व कार्य म्हणजे जगत, कर्ता म्हणजे ईश्वर व कारण म्हणजे माया या सर्वांचाही साक्षी आहे. वरील सर्व आल्याहून निराळी असल्याने त्याची दृश्ये आहेत. (४२)

जीवशिव पिंडब्रह्मांड । मायेअविद्येचें बंड । हें सांगता असे उदंड । परी आत्मा तो वेगळा ॥ ४३ ॥ जीव, शिव, पिंड, ब्रह्मांड, विद्यामाया, अविद्या- माया यांच्याविषयी खूपच सांगता येईल; पण आत्मा या सर्वांहून वेगळाच आहे. (४३)

पाहों जातां आत्मे च्यारी । त्यांचे लक्षण अवधारीं । हें जाणोनि अभ्यांतरीं । सदृढ धरावें ॥ ४४ ॥ तसे पाहू गेले तरी चार आत्ये आहेत असे सांगितले जाते. त्यांची लक्षणे ऐकून ती अंतरात सुदृढ धरावीत. (४४)

एक जीवात्मा दुसरा शिवात्मा । तिसरा परमात्मा जो विश्वात्मा । चौथा जाणिजे निर्मळात्मा । ऐसे च्यारी आत्मे ॥ ४५ ॥ एकजीवाला, दुसस शिवाला, तिसरा जो सर्व विश्वाचा आत्मा त्यालाच परमात्मा असेही म्हणतात व चौथा निर्मळत्या असे चार आत्मे सांगितले जातात. (४५)

भेद उंच नीच भासती । परी च्यारी एकचि असती । येविषीं दृष्टांत संमती। सावध ऐका ॥ ४६ ॥ त्यांत उच्च, नीच असे भेद भासत असले तरी वास्तविक ते चारी एकच आहेत. हे कळावे म्हणून दृष्टान्त सांगितला जात आहे, तो सावधपणे ऐकावा. (४६)

घटाकाश मठाकाश । महदाकाश चिदाकाश । अवघे मिळोन आकाश । येकचि असे ॥ ४७ ॥ घयकाश, मठाकाश, महदाकाश व चिदाकाश अशी चार आकाशे सांगितली जात असली, तरी खरे पाहता सर्व मिळून एकच आकाश आहे. (४७)

तैसा जीवात्मा आणि शिवात्मा । परमात्मा आणी निर्मळाता । अवघा मिळोन आत्मा । येकचि असे ॥ ४८ ॥ त्याप्रमाणेच जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा आणि निर्मळत्या सर्व मिळून एकच आत्या आहे. (४८)

घटीं व्यापक जें आकाश । तया नाव घटाकाश । पिंडी व्यापक ब्रह्मांश । त्यास जीवात्मा बोलिजे ॥ ४९ ॥ घटला व्यापून जे आकाश असते त्याचे नाव घयकाश तसा पिंडाला व्यापून जो ब्रह्मांश असतो, त्याला जीवात्मा म्हणतात. (४९)

मठीं व्यापक जें आकाश । तया नाव मठाकाश । तैसा ब्रह्मांडीं जो ब्रह्मांश । त्यास शिवात्मा बोलिजे ॥ ५० ॥ मठाला जे आकाश व्यापून असते. त्याला मठाकाश म्हटले जाते. त्याप्रमाणे ब्रह्मांडी जो ब्रह्मांश व्यापून असतो, त्याला शिवाला म्हणतात. (५०)

मठाबाहेरील आकाश । तयाअ नांव महदाकाश । ब्रह्मांडाबाहेरील ब्रह्मांश । त्यास परमात्मा बोलिजे ॥ ५१ ॥ मठाच्या बाहेर जे आकाश असते त्याला महदाकाश असे नाव आहे. त्याप्रमाणे ब्रह्मांडाबाहेरील जो ब्रह्मांश त्याला परमात्मा म्हणतात. (५१)

उपधीवेगळें आकाश । तया नाव चिदाकाश । तैसा निर्मळात्मा परेश । तो उपधिवेगळा ॥ ५२ ॥ उपाधीवेगळे जे आकाश त्याला चिदाकाश असे नाव आहे तसेच उपाधिवेगळा जो ब्रह्मांश तोच निर्मळाला परेश जाणावा. (५२)

उपाधियोगें वाटे भिन्न । परी तें आकाश अभिन्न । तैसा अत्मा स्वानंदघन । येकचि असे ॥ ५३ ॥ उपाधीच्या योगे आकाश भिन्न भासते पण वास्तविक ते अभिन्नच असते त्याप्रमाणे स्वानदघन असा एकच आत्मा आहे. (५३)

दृश्या सबाह्य अंतरीं । सूक्ष्मात्मा निरंतरीं । त्याचि वर्णावया थोरी । शेष समर्थ नव्हे ॥ ५४ ॥ दृश्याला आतून-बाहेरून व्यापून असणारा सूक्ष्मात्मा निरंतर एकच आहे. त्याची थोरवी वर्णन करायला शेषसुद्धा समर्थ नाही. (५४)

ऐसे आत्म्याचें लक्षण । जाणतां नाहीं जीवपण । उपाधी शोधतां अभिन्न । मुळींच आहे ॥ ५५ ॥ हे आत्य्याचे लक्षण नीट जाणून घेतले की जीवपण उरतच नाही. चारी भेद उपाधीच्या योगाने भासतात. उपाधीचा शोध घेतला की ती मिथ्या ठरते, म्हणून स्वरूपतः हे भेद खरे नसून समजावून सांगण्यासाठी त्यांची कल्पना केली जाते. मुळात आत्या एकच एक आहे. (५५)

जीवपणें येकदेसी । अहंकारें जन्म सोसी । विवेक पाहतां प्राणीयांसी । जन्म कैंचा ॥ ५६ ॥ देहाच्या उपाधीमुळेतो स्वतःला एकदेशी जीव समजतो आणि अहंकारामुळे जन्म भोगत सहतो. नीट विचार केला असता प्राण्याला जन्मच नाही, हे कळून येते. (५६)

जन्ममृत्यापासून सुटला । या नाव जाणिजे मोक्ष जाला । तत्वें शोधितां पावला । तत्वता वस्तु ॥ ५७ ॥ जन्ममृत्यूपासून सुटणे यालाच मोक्ष झाला असे म्हणतात. तत्त्वांचा शोध घेऊ लागले असता, त्या तत्त्वांपासून आपण भिन्न आहोत, हे कळून येते व अशा रीतीने शोध घेता घेता तो शोध घेणारा वेगळा उरतच नाही, तर तो तत्त्वतः वस्तूच होतो. (५७)

तेचि वस्तु ते आपण । हें माहावाक्याचें लक्षण । साधु करीती निरूपण । आपुलेन मुखें ॥ ५८ ॥ आपण म्हणजे ती वस्तूच आहे. ‘ तत्त्वमसि ‘ हे महावाक्य आहे. साधू आपल्या मुखाने याच महावाक्याचे स्पष्टीकरण करतात. (५८)

जेचि क्षणी अनुग्रह केला । तेचि क्षणीं मोक्ष जाला । बंधन कांहीं आत्मयाला । बोलोंचि नये ॥ ५९ ॥ ज्या क्षणाला गुरू असा अनुग्रह करतात त्याच क्षणी मोक्ष मिळतो. आत्य्याला बंधन आहे असे बोलूसुद्धा नये. (५९)

आतां आशंका फिटली । संदेहवृत्ती मावळली । संतसंगें तत्काळ जाली । मोक्षपदवी ॥ ६० ॥ आता शंकेचे निरसन होऊन संदेहवृत्ती नाहीशी झाली आणि सताच्या संगतीने तात्काळ मोक्षपदाची प्राप्ती झाली. (६०)

स्वप्नामधें जो बांधला । तो जागृतीनें मोकळा केला । ज्ञानविवेकें प्राणीयाला । मोक्षप्राप्ती ॥ ६१ ॥ स्वप्नामध्ये ज्याला वाटत होते की आपण बांधले गेले आहोत त्याला जागृती आली असता कळून येते की, आपण तर मोकळेच आहोत. (६१)

अज्ञाननिसीचा अंतीं । संकल्पदुःखें नासती । तेणें गुणें होये प्राप्ती । तत्काळ मोक्षाची ॥ ६२ ॥ अज्ञानरूपी रात्रीचा शेवट झाला की संकल्पाने निर्माण झालेली दुःखे नाहीशी होतात आणि त्यायोगे तात्काळ मोक्षाची प्राप्ती होते. (६२)

तोडावया स्वप्नबंधन । नलगे आणिक साधन । तयास प्रेत्न जागृतीवीण । बोलोंचि नये ॥ ६३ ॥ स्वप्नातील बंधन तोडायला दुसरे काही साधन करावयाची जरुरी नसते. जागृतीशिवाय इतर प्रयतांचा विचारही करू नये. (६३)

तैसा संकल्पें बांधला जीव । त्यास आणिक नाही उपाव । विवेक पाहतां वाव । बंधन होये ॥ ६४ ॥ त्याप्रमाणे संकल्पाने जीव बांधलेला असतो. त्यातून सुटण्यास विवेकाशिवाय दुसरा उपाय नाही. विवेक केला की, नसून असल्यासारखे मानलेले बंधन नाहीसे होते. (६४)

विवेक पाहिल्याविण । जो जो उपाव तो तो सीण । विवेक पाहातां आपण । आत्माच असे ॥ ६५ ॥ विवेक न करता दुसरी जी जी साधने करावीत त्याने सर्व शीणच होतो. विवेक केला की आपण आत्माच आहोत हे कळते. (६५)

आत्मयाचा ठांई कांहीं । बद्ध मोक्ष दोनी नाहीं । जन्ममृत्य हें सर्वहि । आत्मत्वीं न घडे ॥ ६६ ॥ आत्म्याच्या ठिकाणी बंध, मोक्ष दोन्हीही नाहीत. जन्ममृत्यू इत्यादी सर्वही आत्म्याच्या ठिकाणी घडत नाहीत. (६६)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे मोक्षलक्षणनाम समास सातवा ॥ ७ ॥

20px