Samas 9
समास ९ - समास नववा : सिद्धलक्षण
समास ९ - दशक ८
समास नववा : सिद्धलक्षणनाम ॥ श्रीराम ॥
अंतरी गेलीयां अमृत । बाह्या काया लखलखित । अंतरस्थिति बाणतां संत । लक्षणें कैसीं ॥ १ ॥ श्रोता वकास प्रश्न करीत आहे. एखाद्याने अमृत प्राशन केले की ते पोयत गेल्यावर त्याची बाह्य कांतीसुद्धा लखलखीत दिसते, त्याप्रमाणे अंतरात स्वस्वरूपानुभव आलेल्या संतांची बाह्य लक्षणे कशी असतात ते सांगावे. (१)
जालें आत्मज्ञान बरवें । हे कैसेनि पां जाणावें । म्हणौनि बोलिलीं स्वभावें । साधुलक्षणें ॥ २ ॥ एखाद्याला आत्मज्ञान निसदेहपणे झालेले आहे, हे कसे जाणावे ? या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आता स्वाभाविकपणे साधुलक्षणे सांगतो. (२)
ऐक सिद्धांचे लक्षण । सिद्ध म्हणिजे स्वरूप जाण । तेथें पाहातां वेगळेपण । मुळीच नाहीं ॥ ३ ॥ आता सिद्धांचे लक्षण ऐक. सिद्धाचे मुख्य लक्षण म्हणजे तो स्वस्वरूपाशी एकरूप झालेला असतो. तेथे वेगळेपण जराही शिल्लक राहिलेले नसते. (३)
स्वरूप होऊन राहिजे । तया नाव सिद्ध बोलिजे । सिद्धस्वरूपींच साजे । सिद्धपण ॥ ४ ॥ स्वरूप होऊन शहाणे, यालाच सिद्ध हे नाव आहे. जो स्वरूपाकार होऊन सहतो त्यालाच सिद्ध असे म्हणतात. कारण स्वरूप हे नेहमी स्वयंसिद्ध असते. (४)
वेदशास्त्रीं जें प्रसिद्ध । सस्वरूप स्वतसिद्ध । तयासिच बोलिजे सिद्ध । अन्यथा न घडे ॥ ५ ॥ स्वस्वरूप स्वयंसिद्ध आहे, हे वेदात, शास्त्रांतही प्रसिद्ध आहे. हे स्वयंसिद्ध स्वरूप जो स्वतः झाला त्यालाच सिद्ध म्हणावे. अन्यत्र ‘ सिद्ध ‘ या शब्दाचा प्रयोग करताच येत नाही. (५)
तथापी बोलों काहीं येक । साधकास कळाया विवेक । सिद्धलक्षणाचें कौतुक । तें हें ऐसें असे ॥ ६ ॥ तरी पण साधकाला विचार करून जाणता यावीत, म्हणून काही सिद्ध लक्षणांचे कौतुकाने वर्णन करीत आहे. ते असे (६)
अंतरस्थित स्वरूप जाली । पुढें काया कैसी वर्तली । जैसी स्वप्नीची नाथिली । स्वप्नरचना ॥ ७ ॥ स्वप्नात ज्याप्रमाणे मिथ्याच काही दिसते, ऐकू येते, त्याप्रमाणे सिद्ध पुरुषाची अंतरस्थिती स्वरूपाकार झाली तरी देहाने तो इतर सामान्य लोकांप्रमाणे व्यवहार करताना दिसतो. (७)
तथापि सिद्धांचें लक्षण । कांहीं करूं निरूपण । जेणें बाणे अंतर्खूण । परमार्थाची ॥ ८ ॥ तरीही परमार्थाची अतर्खूण बाणावी, म्हणून येथे काही सिद्ध- लक्षणांचे निरूपण केले जात आहे (८)
सदा स्वरूपानुसंधान। हें मुख्य साधूचें लक्षण । जनीं असोन आपण । जनावेगळा ॥ ९ ॥ निरंतर स्वरूपानुसंधान हे साधूचे मुख्य लक्षण आहे. तो लोकांत लोकांसारखाच वागत असतो, पण त्याची अंतरस्थिती अगदी लोकांवेगळी असते. (९)
स्वरूपीं दृष्टी पडतां । तुटोन गेली संसारचिंता । पुढें लागली ममता । निरूपणाची ॥ १० ॥ स्वस्वरूपानुभव आल्यानेत्यात्यप्रपंचाची चिंताच राहत नाही, तर अध्यात्मनिरूपणाबद्दल प्रेम वाटू लागते. (१०)
हें साधकाचें लक्षण । परी सिद्धाआंगीं असे जाण । सिद्धलक्षण साधकेंविण । बोलोंच नये ॥ ११ ॥ खरे पाहिले तर हे साधकाचे लक्षण आहे, पण ते सिद्धाच्याही ठिकाणी दिसून येते. कारण साधकच साधन करून पुढे सिद्ध झालेला असतो. त्यामुळे साधकाची लक्षणेच सिद्धाच्याही ठिकाणी आढव्यात. (११)
बाह्य साधकाचें परी । आणी स्वरूपाकार अंतरीं । सिद्धलक्षण चतुरीं । जाणिजे ऐसें ॥ १२ ॥ बाहेरून त्याचे आचरण उत्तम साधकासारखेच असते, पण अंतरी तो स्वरूपाकार झालेला असतो, हे चतुर श्रोत्यांनी जाणून घ्यावे. (१२)
संदेहरहीत साधन । तेचि सिद्धांचे लक्षण । अंतर्बाह्य समाधान । चळेना ऐसें ॥ १३ ॥ सिद्ध बाहेरून साधन करीत असला तरी त्याच्या अंतरात कुठलाही संदेह नसतो. त्याचे साधन निःसंदेहपणे चालते. बाह्य परिस्थिती कशीही असली तरी त्याचे अंतर्बाह्य समाधान जगही ढळत नाही. (१३)
अचळ जाली अंतरस्थिती । तेथें चळणास कैची गती । स्वरूपीं लागतां वृत्ती । स्वरूपचि जाली ॥ १४ ॥ सतत स्वरूपानुसंधानामुळे त्याची अंतरस्थिती अढळ झालेली असते. तेथे चलन होईलच कसे ? स्वरूपाकडे वृत्ती सतत लागली की ती स्वरूपच होऊन जाते. स्वरूपाशी तिचे ऐक्य होते (१४)
मग तो चळतांच अचळ । चंचळपणें निश्चळ । निश्चळ असोन चंचळ । देह त्याचा ॥ १५ ॥ अशी स्थिती एकदा प्रास झाली की देहाची हालचाल होत असतानाही तो अंतर्यामी स्थिर अचल असतो. चंचल दिसत असला तरी अंतर्यामी निश्चल असतो आणि याप्रमाणे अंतर्यामी निश्चल असूनही देहाची सर्व हालचाल सुरू असते. (१५)
स्वरूपीं स्वरूपचि जाला । मग तो पडोनिच राहिला । अथवा उठोनि पळाला । तरी चळेना ॥ १६ ॥ स्वरूपी जो स्वरूपाकार होऊन सहतो, तो देहाने एका ठिकाणी पडून राहिला अथवा उडून धावत सुटला, तरी त्यामुळे त्याच्या अंतरस्थितीत बदल होत नाही. (१६)
येथें कारण अंतरस्थिती । अंतरींच पाहिजे निवृत्ती । अंतर लागलें भगवंतीं । तोचि साधु ॥ १७ ॥ येथे अंतरस्थितीच अत्यंत महत्त्वाची आहे. अंतरी वृत्तीच नाही, अशी निवृत्त अवस्था होणे आवश्यक आहे. ज्याचे अंतःकरण भगवंताकडे लागलेले असते, तोच साधू होय. (१७)
बाह्य भलतैसें असावे । परी अंतर स्वरूपीं लागावें । लक्षणे दिसती स्वभावें । साधुआंगीं ॥ १८ ॥ बाहेरून देहाची स्थिती कशीही असली तरी अंतर्यामी स्वरूपानुसंधान असले पाहिजे. त्यामुळे साधूच्या अंगी काही लक्षणे स्वाभाविकरीत्याच दिसून येतात. (१८)
राजीं बैसतां अवलिळा । आंगीं बाणे राजकळा । स्वरूपीं लागतां जिव्हाळा । लक्षणे बाणती ॥ १९ ॥ एखादा मनुष्य अकस्मात राज्यपदावर आला की, त्याच्या अंगी वजकळ आपोआप बाणते. त्याप्रमाणे स्वरूपी लक्ष लागले, प्रेम उत्पन्न झालेकी काही लक्षणे आपोआप अंगी बाणतात. (१९)
येरव्ही अभ्यास करितां । हाता न चढती सर्वथा । स्वरूपीं राहावें तत्त्वतां । स्वरूप हौनी ॥ २० ॥ ती लक्षणे एरवी कितीही अभ्यास केला तरी प्रास होऊ शकत नाहीत, स्वरूपाच्या ठिकाणी स्वरूपाकार होऊन राहावे लागते. तरच ती लक्षणे अंगी बाणतात. (२०)
अभ्यासाचा मुगुटमणी । वृत्ती राहावी निर्गुणीं । संतसंगें निरूपणीं । स्थिती बाणे ॥ २१ ॥ वृत्ती सतत निर्गुणी सहाणे ही अभ्यासातील सर्वोच्च स्थिती आहे. संतसंगतीत सतत अध्यात्माचे निरूपण श्रवण केल्याने ती स्थिती अंगी बाणते. (२१)
ऐसीं लक्षणें बरवीं । स्वरूपाकारें अभ्यासावीं । स्वरूप सोडितां गोसावी । भांबावती ॥ २२ ॥ स्वरूपानुसंधानाने स्वरूपाकार होत असता या उत्तम व्यणांचाही अभ्यास करावा. स्वरूपानुसंधान सुटले की सिद्धही भ्रष्ट होतात. (२२)
आतां असो हें बोलणें । ऐका साधूची लक्षणें । जेणें समाधान बाणे । साधकाअंगीं ॥ २३ ॥ असो. आता हेबोलणे पुरेझाले आता ज्यायोगे साधकाच्या अंगी समाधान बाणते, ती सास्ती लक्षणे ऐका. (२३)
स्वरूपीं भरतां कल्पना । तेथें कैंची उरेल कामना । म्हणौनियां सधुजना । कामचि नाहीं ॥ २४ ॥ स्वरूप निर्विकल्प असल्याने तेथे कल्पना करू लागल्यास कल्पनाच नाहीशी होते, तर कल्पनेमुळे उत्पन्न होणारी कामना तेथे कशी शिल्लक उरेल ? म्हणून साधू निष्काम असतात. (२४)
कल्पिला विषयो हातींचा जावा । तेणें गुणें क्रोध यावा । साधुजनाचा अक्षै ठेवा । जाणार नाहीं ॥ २५ ॥ आपण एखादी वस्तू वा भोग प्रास व्हावा, म्हणून कल्पना केली आणि ती इच्छा पुरी झाली नाही की आपल्याला राग येतो, पण साधूचा ठेवा अक्षय असतो. स्वस्वरूपरूप ठेवा कधी नाहीसा होतच नाही. (२५)
म्हणोनि ते क्रोधरहित । जाणती स्वरूप संत । नासिवंत हे पदार्थ । सांडुनिया ॥ २६ ॥ म्हणून साधू हे क्रोधरहित असतात. सर्व नाशिवंत पदार्थांचा त्यांनी मनाने त्याग केलेला असतो व स्वरूप हे सत्य आहे, नित्य आहे हे जाणून त्यांनी त्याचा स्वीकार केलेला असतो. (२६)
जेथें नाहीं दुसरी परी । क्रोध यावा कोणावरी । क्रोधरहित चराचरीं । साधुजन वर्तती ॥ २७ ॥ जेथे दुसरे कोणी नाहीच, तेथे क्रोध तरी कुणावर करणार ? म्हणून या जगात वावरत असूनही साधू क्रोधरहित असतात. (२७)
आपुला आपण स्वानंद । कोणावरी करावा मद । याकारणें वादवेवाद । तुटोन गेला ॥ २८ ॥ आपणच स्वानंदरूपाने सर्वत्र असताना गर्व तरी कुणावर करणार त्यामुळे कुणाशी वादविवाद करण्याचा प्रसंगच येत नाही. (२८)
साधु स्वरूप निर्विकार । तेथें कैंचा तिरस्कार । आपला आपण मत्सर । कोणावरी करावा ॥ २९ ॥ साधू स्वरूपाकारझाच्छै असतात आणि स्वरूप तरनिर्विकार आहे, मग तिरस्कार उत्पन्न होईलच कसा ? सर्वत्र आपणच आहोत तर आपणच आपला मत्सर कसा करणार (२९)
साधु वस्तु अनायासें । याकारणें मत्सर नसे । मदमत्सराचें पिसें । साधुसी नाहीं ॥ ३० ॥ साधू अनायासे आत्मवस्तुरूप झालेले असतात. त्यामुळे तेथे विकारांना वावच नसल्याने मद-मत्ससचे खूळ साधूंच्या ठिकाणी नसते. (३०)
साधु स्वरूप स्वयंभ । तेथें कैंचा असेल दंभ । जेथे द्वैताचा आरंभ जालाच नाही ॥ ३१ ॥ साधू हे स्वतःसिद्ध स्वरूपाकार झालेले असतात. तेथे द्वैत निर्माणच होऊ शकत नाही, मग तेथे दंभ असेलच कसा ? (३१)
जेणें दृष्य केलें विसंच । तयास कैंचा हो प्रपंच । याकारणें निःप्रपंच । साधु जाणावा ॥ ३२ ॥ ज्याने सर्व दृश्य वृष्टी मिथ्या जाणून तिचा त्याग केलेला असतो, त्याला प्रपंच कसा असेल ? म्हणून साधू हा निःप्रपंच असतो हे जाणून घ्यावे. (३२)
अवघें ब्रह्मांड त्याचे घर । पंचभूतिक हा जोजार । मिथ्या जाणोन सत्वर । त्याग केला ॥ ३३ ॥ ज्याने हा पांचभौतिक पसारा मिथ्या आहे हे कळताच सत्वर त्याचा त्याग केलेला असतो व अवघे ब्रह्मांड हेच ज्याचे घर झालेले असते, तो साधू होय. (३३)
याकारणें लोभ नसे । साधु सदा निर्लोभ असे । जयाची वासना समरसे । शुद्धस्वरूपीं ॥ ३४ ॥ पांचभौतिक पसारा मिथ्या हे तो जाणत असल्याने त्याला कशाचाही लोभ नसतो. शुद्ध स्वस्वरूपाच्या ठिकाणी त्याची वासना लय पावलेली असते, म्हणून साधू सदा निर्लोभ असतो (३४)
आपुला आपण आघवा । स्वार्थ कोणाचा करावा । म्हणोनि साधु तो जाणावा । शोकरहित ॥ ३५ ॥ आत्मरूपाने आपणच सर्वत्र व्यास आहोत, असे तो जाणतो. मग स्वार्थ कोणाचा साधावा ? साधू स्वार्थरहित होतो. त्यामुळेच तो शोकरहितही होतो. (३५)
दृष्य सांडुन नासिवंत । स्वरूप सेविलें शाश्वत । याकारणें शोकरहित । साधु जाणावा ॥ ३६ ॥ नाशिवंत दृश्याचे मिथ्यापण जाणून साधूने त्याचा त्याग केलेला असतो व शाश्वत अशा स्वरूपाचा आश्रय केलेला असल्याने साधू शोकरहित झालेला असतो, हे जाणावे. (३६)
शोकें दुखवावी वृत्ती । तरी ते जाहली निवृत्ती । म्हणोनि साधु आदिअंतीं । शोकरहीत ॥ ३७ ॥ शोकामुळे मनात दुःखाची वृत्ती उत्पन्न होते, पण साधू हा वृत्तिरहित झालेला असतो. म्हणून तो आदि व अंती शोकरहित असतो. (३७)
मोहें झळंबावें मन । तरी तें जाहालें उन्मन । याकारणें साधुजन । मोहातीत ॥ ३८ ॥ मन मोहाने पछाडलेजाते, पण साधू उन्मनी अवस्था प्रास झालेली असल्याने तो मोहातीत असतो. (३८)
साधु वस्तु अद्वये । तेथें वाटेल भये । परब्रह्म तें निर्भये । तोचि साधु ॥ ३९ ॥ आत्मवस्तु एकच आहे. तिच्याशी साधू एकरूप झालेला असल्याने त्याला भय कशाचे वाटणार ? परब्रह्म जसे निर्भय असते, तसाच त्याच्याशी ऐक्य पावलेला साधूही निर्भय असतो. (३९)
याकारणें भयातीत । साधु निर्भय निवांत । सकळांस मांडेल अंत । साधु अनंतरूपी ॥ ४० ॥ साधू हा भयातीत असल्याने निर्भय आणि निवांत असतो. सर्व दृश्य सूष्टीचाप्रल्यकाळी अंत ओढवला तरी साधू अनंतरूप परब्रह्माशी ऐक्य पावल्याने अनंतच होतो ! ४०)
सत्यस्वरूपें अमर जाला । भये कैंचें वाटेल त्याला । याकारणें साधुजनाला । भयेचि नाहीं ॥ ४१ ॥ सत्यस्वरूपी ऐक्य पावून तो अमर झालेला असतो. मगत्याला भय कसे वाटेल ? म्हणून साधूंना भयचनसते(४१)
जेथें नाहीं द्वंद्वभेद । आपला आपण अभेद । तेथें कैंचा उठेल खेद । देहबुद्धीचा ॥ ४२ ॥ जेथे द्वैतामुळे येणारे वितुष्ट नाही, तेथे खेद कसा उत्पन्न होणार ? देहबुद्धीमुळे खेद उत्पन्न होतो. साधू आपण केवळ अभेद म्हणजे एकच आत्मरूप झालेला असल्याने त्यास खेद होत नाही. (४२)
बुद्धिनें नेमिलें निर्गुणा । त्यास कोणीच नेईना । याकारणें साधुजना । खेदचि नाहीं ॥ ४३ ॥ त्याच्या बुद्धीने निर्गुणाचा निश्चय केलेला असतो आणि निर्गुणाला तर कोणी नेऊच शकत नाही. त्यामुळे साधूंना खेदच नसतो (४३)
आपण एकला ठाईचा । स्वार्थ करावा कोणाचा । दृष्य नसतां स्वार्थाचा । ठावचि नाहीं ॥ ४४ ॥ आपण तो एकला एक असतो, तर स्वार्थ कुणाचा करणार ? दृश्य मिथ्या ठरल्याने स्वार्थाला जागाच उरली नाही. (४४)
साधु आपणचि येक । तेथें कैंचा दुःखशोक । दुजेविण अविवेक । येणार नाहीं ॥ ४५ ॥ साधू स्वरूपाकार झाल्याने द्वैत पूर्ण निःशेष झालेले असते. दुसत कोणी नाहीच, तर अविवेकतरीई कसा असणार ? आणि मग दुःख-शोक तरी कसे असणार ? (४५)
आशा धरितां परमार्थाची । दुराशा तुटली स्वार्थाची । म्हणोनि नैराशता साधूची । वोळखण ॥ ४६ ॥ परमार्थाची इच्छा धरल्याने स्वार्थाची दुराशा नष्ट झाली, म्हणून निःस्मृहता किंवा वैराग्य हे साधूचे लक्षण जाणावे. (४६)
मृदपणें जैसे गगन । तैसें साधुचें लक्षण । याकरणें साधुवचन । कठीण नाहीं ॥ ४७ ॥ गगन जसे मृदू असते तसा स्वरूपाकार झालेला सास्ती मृदू असतो. म्हणून तो कधी कठोर वचन बोलच नाही. (४७)
स्वरूपाचा संयोगीं । स्वरूपचि जाला योगी । याकरणें वीतरागी । निरंतर ॥ ४८ ॥ स्वरूपाशी ऐक्य झाल्याने योगी स्वरूपच झालेला असतो. म्हणून तो निरंतर अनासक्त असतो. (४८)
स्थिती बाणतां स्वरूपाची । चिंता सोडीली देहाची । याकरणें होणाराची । चिंता नसे ॥ ४९ ॥ स्वरूपस्थिती बाणल्यामुळे त्याने देह प्रारब्धावर सोडलेला असतो. जे आपले स्वरूप नाही त्याची चिंता कशाला करायची ? म्हणून त्याने पुढे काय होईल, कसे होईल अशी देहाच्या संबंधाने उत्पन्न होणारी चिंता सोडलेली असते. (४९)
स्वरूपीं लागतां बुद्धी । तुटे अवघी उपाधी । याकारणें निरोपाधी । साधुजन ॥ ५० ॥ बुद्धी स्वरूपाच्या ठिकाणी जडल्यामुळे सर्व उपाधी नष्ट होतात. म्हणून साधूलोक निरुपाधिक असतात. (५०)
साधु स्वरूपींच राहे । तेथें संगचि न साहे । म्हणोनि साधु तो न पाहे । मानापमान ॥ ५१ ॥ साधू नेहमी स्वरूपाकार होऊन राहतो आणि स्वरूप तर निःसंग असते, त्यामुळे सास्ती निःसंग होतो. म्हणून तो मानापमानाचा विचारच करीत नाही. (५१)
अलक्षास लावी लक्ष । म्हणोनि साधु परम दक्ष । वोढूं जाणती कैपक्ष । परमार्थाचा ॥ ५२ ॥ साधू अक्स अशा आत्मस्वरूपावर लक्ष केंद्रित करतो, म्हणून तो अत्यंत सावध असतो आणि नेहमी परमार्थाचा कैवार घेतो. (५२)
स्वरूपीं न साहे मळ । म्हणोनि साधु तो निर्मळ । साधु स्वरूपचि केवळ । म्हणोनियां ॥ ५३ ॥ स्वरूपाच्या ठिकाणी मायारूपी मळ नसतो म्हणून सास्ती निर्मळ असतात. कारण ते स्वरूपच झालेले असतात. (५३)
सकळ धर्मामधें धर्म । स्वरूपीं राहाणें हा स्वधर्म । हेंचि जाणें मुख्य वर्म । साधुलक्षणाचें ॥ ५४ ॥ सर्व धर्मामध्ये स्वधर्म हा श्रेष्ठ धर्म असतो आणि स्वरूपी राहाणे हाच स्वधर्म होय. साधू निरंतर स्वरूपी राहत असतात, हेच साधुलक्षणाचे मुख्य वर्म आहे. (५४)
धरीतां साधूची संगती । आपषाच लागे स्वरूपस्थिती । स्वरूपस्थितीनें बाणती । लक्षणें आंगीं ॥ ५५ ॥ सास्ती संगत धरली म्हणजे आपोआप स्वरूपस्थिती प्रास होते आणि स्वरूपस्थितीमुळे सास्ती लक्षणे अंगी बाणतात. (५५)
ऐसीं साधूचीं लक्षणें । आंगीं बाणती निरूपणें । परंतु स्वरूपीं राहाणें । निरंतर ॥ ५६ ॥ अध्यात्मनिरूपणाने, त्याच्या श्रवणाने साधूची लक्षणे अंगी बाणतात, पण निरंतर स्वरूपी राहावयास हवे. (५६)
निरंतर स्वरूपीं साहातां । स्वरूपचि होईजे तत्त्वतां । मग लक्षणें आंगीं बाणतां । वेळ नाहीं ॥ ५७ ॥ निरंतर स्वरूपी वहिले की तत्त्वतः साधक स्वस्वरूपच होतो. मग सास्ती लक्षणे अंगी बाणण्यास वेळ लागत नाही. (५७)
स्वरूपीं राहिल्यां मती । अवगुण अवघेचि साडती । परंतु यासी सत्संगती । निरूपण पाहिजे ॥ ५८ ॥ बुद्धी स्वरूपामध्ये स्थिर वहिली की, सर्व अवगुण नष्टहोतात, पण हेसर्व होण्यासाठी सत्संगती आणि संतमुखाने अध्यात्मनिरूपण ऐकणे हे व्हावयालाच हवे. (५८)
सकळ सृष्टीचा ठाईं । अनुभव येकचि नाहीं । तो बोलिजेल सर्वहि । पुढिले समासीं ॥ ५९ ॥ सर्व वृष्टीमध्ये सर्वांचा अनुभव एकसारखाच नसतो. त्यासंबंधी पुढील समासात सांगितले जाईल (५९)
कोणें स्थितीनें राहाती । कैसा अनुभव पाहाती । रामदास म्हणे श्रोतीं । अवधान देणें ॥ ६० ॥ कोण कोण कुठल्या प्रकारे राहतात, त्यांना काय काय अनुभव येतात, ते श्रोत्यांनी अवधान देऊन ऐकावे, असे रामदास सांगतात. (६०)
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सिद्धलक्षणनाम समास नववा ॥